Home विदर्भ समाजाच्या प्रगतीसाठी संघठीत होणे गरजेचे : खनिज मंत्री जायसवाल

समाजाच्या प्रगतीसाठी संघठीत होणे गरजेचे : खनिज मंत्री जायसवाल

0

गोंदिया,दि.24 : संपूर्ण भारतात कलार समाजाचे विशाल अस्तित्व आहे. परंतु, विभीन्न उपजातीय मध्ये विखुरल्यामुळे समाजाचे राजनितीक अस्तित्त्व फार कमी आहे. म्हणून समाजाच्या प्रगतीसाठी राजनैतिक अस्तित्त्व प्राप्त करण्यासाठी सर्वांनी संघटीत होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे खनिज मंत्री प्रदिप (गुड्डा) जायसवाल यांनी केले.
गोंदिया येथील जैन कलार समाज बांधकाम भूमिपूजन व स्नेह संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक भारत सरकार मधील जिवजंतू कल्याण बोर्डचे सदस्य तथा कलार समाजाचे राष्ट्रीय नेते मोहनसिंग अहलुवालिया तर क्षेत्रिय आमदाराच्या विकास निधीतून पाच लक्ष रूपयाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सभापती शैलजा सोनवाने, जि.प.सदस्य दुर्गा तिराले, अ.भा.कलार समाजाचे अध्यक्ष मुकेश शिवहरे, राष्ट्रीय कलचुरी महासंघाचे अध्यक्ष दिपक जायस्वाल, बिरसी विमानतळाचे निदेशक सचिन खंगार, माजी सभापती प्रकाश रहमतकर,मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रल्हाद हरडे, समाजाचे अध्यक्ष तेजराम मोरघडे, सचिव एल.यु.खोब्रागडे, माजी अध्यक्ष काशिनाथ सोनवाने, अशोक लिचडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम माजा जैनादेवी व भगवान सहस्त्रबाहू यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून विधिवत पुजन करण्यात आले. यावेळी समाजाचे सचिव एल.यु.खोब्रागडे यांनी समाजाच्या वाटचालीबद्दल सविस्तर माहिती दिली. समाज कार्यासाठी सहकार्य करणाNया समाजबंधू भगिनींचे आभार प्रास्ताविकातून व्यक्त केले. दरम्यान प्रमुख मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी रांगोळी स्पर्धेतील श्रुती सोनवाने,ज्योती सोनवाने, श्रावणी मोरघडे, मेहंदी स्पर्धेतील जिज्ञासा मोरघडे, सलोनी तिडके, ज्योती सोनवाने, प्रिती भांडारकर, एकल नृत्य अवनी चिर्वतकर, आंचल हजारे, जयेश मुरकुटे, समुह नृत्यात वैद्येही भांडारकर व खुशी हलमारे, त्रिशा खंगार, रंजु हजारे, सुप्रिया मोरघडे यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महिला समितीच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात महिला उत्स्पूâर्तपणे सहभाग घेतला. यावेळी स्व.परसराम मोरघडे यांच्या स्मृतीत भैय्यालाल मोरघडे यांनी एक लाख रूपये, स्व.उदाराम खोब्रागडे यांच्या स्मृतीत सुखराम खोब्रागडे यांनी २५ हजार रूपये व स्व.चैतराम मुरकुटे यांच्या स्मृतीत हेमंत मुरकुटे यांनी ११ हजाराचा धनादेश समाजाला देण्यात आला. तर इतरही समाजबांधवांनी निधी देण्याची घोषणा केली. दरम्यान कार्यक्रमात आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत गुणवंत विद्याथ्र्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात अ गटातून श्रुती सोनवाने, आर्या तिडके, केशव सोनवाने, ब गटात किर्ती भांडारकर, ईशिका मुरकुटे, केशव लिचडे यांचा समावेश होता. तर गुणवंत विद्यार्थी पियुश ईटानकर, यशस्वी चिर्वतकर, टिंकल कावळे, प्रचिती आष्टीकर, नितीन ईटानकर, जिज्ञासा मोरघडे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन यशोधरा सोनवाने व उमेश भांडारकर यांनी तर आभार युवा सचिव वरूण खंगार यांनी मानले. कार्यक्रमासाठी तेजराम मोरघडे,शालिकराम लिचडे, सुखराम हरडे, लालचंद भांडारकर, अशोक इटानकर, मनोज भांडारकर,चंद्रशेखर लिचडे, संजय मुरकुटे, मनोज किरणापुरे,सचिन पालांदूरकर, अतुल खोब्रागडे, राजकुमार पेशने आदिंसह समाजाबांधवांनी सहकार्य केले.

Exit mobile version