Home विदर्भ एसडीपीओ काळे यांची नंदुरबारला बदली

एसडीपीओ काळे यांची नंदुरबारला बदली

0

गडचिरोली,दि.१४ः-महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे झालेल्या भुसरुंगस्पोटात १५ पोलिसासह १ खासगी वाहनचालक शहीद झाले होता.या घटनेला कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे हेच जबाबदार असल्याचा आरोप शहीदांच्या कुटुंबीयांकडून व नागरिकांकडून केला जात होता.याप्रकरणात काळे यांनी हलगर्जीपणा करीत चुकीचा निर्णय घेत जवांनाना खासगी वाहनातून पाठविण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळेच नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या भुसुरंगस्पोटात हे जवान शहीद झाल्याचा ठपका ठेवत त्यांची बदली नंदुरबार येथे करण्यात आली आहे.घटनेनंतर काळे यांना सक्तीच्या रजेवर आधीच पाठविण्यात आले होते.आता त्यांना हलवून नंदुरबार येथील जातप्रमाणपत्र पडताळणी विभागात हलविण्यात आले आहे.

Exit mobile version