Home विदर्भ गोठणपार घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या – आमदार विनोद अग्रवाल

गोठणपार घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या – आमदार विनोद अग्रवाल

0
#अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्यांचा चाबी संघटनेकडून निषेध
गोंदिया -जिल्ह्यातील देवरी तालुका अंतर्गत गोठणपार गावातील १२ वर्षीय चिमुकल्या मुलीचा अपहरण करून जंगलात नेवून दुष्कर्म करून चेहरा ओळखीस येऊ नये म्हणून दगडाने ठेचून जीव घेण्याचे अमानुष कृत्य काही नराधमांनी केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला असून जिल्ह्याचे नावाला काळीमा फासणारी घटना मानली जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह संपूर्ण चाबी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवले असून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे या घटनेतील नरधमांना फाशीची शिक्षेची मागणी केलेली आहे. उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील आणि तहसीलदार शमशेर पठाण यांना निवेदनाच्या माध्यमातून निषेध नोंदवत दोषींवर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आरोपींचा अद्याप ठावठिकाणा नसल्याने पोलीस प्रशासन अद्याप आरोपींचा शोध घेण्यास दिरंगाई का करत आहे याबाबतही संघटनेच्या वतीने जाब विचारण्यात आले. ज्या मोटर सायकलने मुलीचा अपहरण झाला त्या मोटरसायकलचा सुद्धा अद्याप पत्ता लागला नाही ही शोकांतिका आहे असेही यावेळेस आमदार विनोद अग्रवाल बोलले. या प्रकरणाला प्राधान्य घेऊन तात्काळ आरोपींच्या शोध घ्यावा अशी सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी केली. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह चाबी संघटनेचे अध्यक्ष भाऊराव उके, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, छत्रपाल तुरकर, किसान आघाडीचे अध्यक्ष मोहन गौतम, जिल्हा परिषदेचे चाबी संघटनेचे गटनेता आनंदा वाढीवा, चेतन बहेकार, सुरेश लिल्हारे, विक्की बघेले, खेमेंद्र पंधरे, अजित टेंभरे, सुर्यमनी रामटेके, रमण लिल्हारे, टिकाराम नागपुरे व चाबी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version