रनेरा येथे शिवाजी महाराज मैदानाचे उदघाटन

0
118

तुमसर,दि.16ःतालुक्यातील रनेरा येथील मोकळ्या जागेवर राजे छत्रपति शिवाजी महाराज मैदानाचे उद्घाटन पुजा अर्चना करुन करण्यात आले.तसेच गावातीलच मनीष चंडीपुसाम या युवकाची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल शॉल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.याप्रसंगी योगराज भाऊ टेंभरे, अरविंद पटले,श्री.कामथे,रमेश उइके आणि सर्व प्रशिक्षण घेत असलेले प्रशिणार्थी उपस्थित होते.पोलीस भरती तसेच सैन्य भरती इतर स्पर्धात्मक भरतीसाठी आवश्यक शारीरिक व्यायामच्या सरावासाठी,परिसरातील युवकांना रनेरा येथील राजे छत्रपति शिवाजी महाराज मैदानावर व्यायाम उपयोगी साहित्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.