
तिरोडा,दि.१६::तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील वैनगंगा नदीवर तयार करण्यात आलेल्या धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायकांळी पाच वाजता घडली. कोरोना काळात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तिरोडा येथील चार तरुण कवलेवाडा धरणातील नदीपात्रात पोहण्यासाटी गेेले असताना खोल पाण्यात जाऊन बुडून मृत्यू झाला.मृत इसमाचे नाव समीर अजिज पठाण वय (अंदाजे 28 ते 30 वर्ष) आहे.सदर तरुण पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहून गेल्याने मृतदेह हाती लागलेला नाही.




