गोंदिया दि.१९ :::: कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत आहे. बाधित चार रुग्णांचा मृत्यू झाला असून १७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात नवे २२६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.
आज जे २२६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ११९ रुग्ण आढळले आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील माताटोली-८, सेलटॅक्स कॉलनी-२, कुडवा-६, गोंदिया-१२, सिव्हील लाईन-५, डी.बी.कॉलेज जवळ-१, साई समर्थ कॉलनी-१, फुलचूर-४, गणेशनगर-६, छोटा गोंदिया-२, टी.बी.टोली-१, शारदानगर-१, सिंधी कॉलनी-४, रिंग रोड-४, गौशाला वार्ड-२, रामनगर-३, गुरुनानक वार्ड-१, गांधी वार्ड-१, कृष्णपुरा वार्ड-४, नागरा-१, सुर्याटोला-२, रेलटोली-१, आसोली-१, शास्त्री वार्ड-२, अवंती चौक-१, सावराटोली-१, कारंजा-३, मरारटोली-२, गांधी प्रतिमा-२, जोगळेकर वार्ड-१, न्यू लक्ष्मीनगर-४, मोटवानी चेंबर-४, महावीर कॉलनी-१, पटेल वार्ड-१, भिमनगर-२, गोविंदपूर-२, पंचायत समिती-१, प्रगती कॉलनी-१, कामठा-३, श्रीनगर-१, हुस्ताड कॉलनी-१, संजयनगर-१, गायत्री कॉलनी-१, कवलेवाडा-१, कुंभारटोली-१, अदासी-२, कटंगी-१, बाई वार्ड-१, एकोडी-१, विनोबा भावे वार्ड-१, बिरसी-१, दुर्गा चौक-१ व परमात्मानगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
तिरोडा तालुक्यातील शहिद मिश्रा वार्ड-५, अशोक वार्ड-३, सुकडी-१, काचेवानी-१, तिरोडा-८, मुंडीकोटा-२, सिल्ली-२, स्टेशन रोड-१, बेलाटी-१, नेहरु वार्ड-५, बेरडीपार-१ व विहिरगाव येथील एक रुग्ण. गोरेगाव तालुक्यातील शहारवानी-१२, आसोली-१, खमारगाव-१, चोपा-१ व गोरेगाव येथील एक रुग्ण. आमगाव तालुक्यातील एक रुग्ण.
सालेकसा तालुक्यातील बिजेपार-२, घोन्सी-१, महाराजटोला-१, दरेकसा-८, लटोरी-१, सालेकसा-१, राऊजीटोला-२, चिंचटोला-१ व सोनपुरी येथील एक रुग्ण. देवरी शहरातील वार्ड नं.१६ येथील चार रुग्ण, वार्ड नं.१० एक रुग्ण, वार्ड नं.१५ एक रुग्ण व वार्ड नं.४ येथील एक रुग्ण. सडक/अर्जुनी तालुक्यातील मालीझुंगा-१, पांढरवाणी-१, सौंदड-१, बाम्हणी-१, खोडशिवनी-१, डुंडा-१ व मुंडीपार येथील एक रुग्ण. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध-२, पारसटोला-१, गोठणगाव-९, अर्जुनी/मोरगाव-६, सिरोली-१, ताडगाव-१ व माहुरकुडा येथील पाच रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-२५४७, तिरोडा तालुका-६२५, गोरेगाव तालुका-१७९, आमगाव तालुका-२९३, सालेकसा तालुका-१३५, देवरी तालुका-१८२, सडक/अर्जुनी तालुका-१२२, अर्जुनी/मोरगाव तालुका-१८९ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-७६ रुग्ण आहे. असे एकूण ४३४८ रुग्ण बाधित आढळले आहे.
आज ज्या १७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका-८९, तिरोडा तालुका-२४, गोरेगाव तालुका-१९, आमगाव तालुका-१९, सालेकसा तालुका-३, देवरी तालुका-८, सडक/अर्जुनी तालुक्यातील आठ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हयात आतापर्यंत २६९५ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-१६२८, तिरोडा तालुका-३८४, गोरेगाव तालुका-९१, आमगाव तालुका-१७८, सालेकसा तालुका-६९, देवरी तालुका-१०९, सडक/अर्जुनी तालुका-१०४, अर्जुनी/मोरगाव तालुका-१२२ आणि इतर-१० रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता १५९३ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-८८७, तिरोडा तालुका-२२९, गोरेगाव तालुका-८७, आमगाव तालुका-१०९, सालेकसा तालुका-६५, देवरी तालुका-७३, सडक/अर्जुनी तालुका-१५, अर्जुनी/मोरगाव तालुका-६६ आणि इतर-६२ असे एकूण १५९३ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी १५९३ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ७६६ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-५४५, तिरोडा तालुका-३७, गोरेगाव तालुका-३७, आमगाव तालुका-४१, सालेकसा तालुका-६, देवरी तालुका-५७, सडक/अर्जुनी तालुका-२८, अर्जुनी/मोरगाव तालुका-१५ व इतर ०० असे एकूण ७६६ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
जिल्हयात आतापर्यंत ६० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-३२, तिरोडा तालुका-१२, गोरेगाव तालुका-१, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-१ व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.
आज ४ कोराना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ६१ वर्षीय रुग्ण राहणार गोंदिया यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ५३ वर्षीय रुग्ण राहणार गोंदिया यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ४९ वर्षीय रुग्ण राहणार भानुटोला (गोंदिया) यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.यांना देखील मधुमेह व उच्च रक्तदाब यांचा त्रास होता. तसेच ५८ वर्षीय रुग्ण राहणार आमगाव यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण २५३१९ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये १९७०३ नमुने निगेटिव्ह आले. तर २८७० नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १७९९ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ९४७ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात २४ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ४१५ व्यक्ती अशा एकूण ४३९ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत १९९३३ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये १८२५२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. १६८१ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १६५ चमू आणि १४६ सुपरवायझर १४९ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-४, आमगाव तालुका-२२, सालेकसा तालुका-११, देवरी तालुका-३१, सडक/अर्जुनी तालुका-२०, गोरेगाव तालुका-२१, तिरोडा तालुका-३५ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-५ असे एकूण १४९ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.
रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोविड-१९ चा अहवाल एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येत आहे.
00000





