जिल्हयात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, आज पुन्हा 72 कोरोनामुक्त

0
626

गडचिरोली दि.21 सप्टेंबर*: जिल्हयात आज कोरोनामूळे 3 मृत्यूंची नोंद झाली. यात अहेरीमधील दोघे यामध्ये 1 जिमलगट्टा येथील 33 वर्षीय पुरूष लिव्हर अब्सेस आजाराने ग्रस्त असलेला व बोरी येथील सारीची 36 वर्षीय महिला रूग्ण जी चंद्रपूर वरून आलेली होती आणि चामोर्शी मार्कंडा देव मधील 65 वर्षीय पुरूष जो किडनी विकार असलेल्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना संसर्ग झाल्याने मृत्यू होणाऱ्या रूग्णांची एकुण संख्या 13 झाली. तसेच एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी गेल्या चोवीस तासात जिल्हयात वेगवेगळया तालुक्यात 72 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली 33, सिरोंचा 16, आरमोरी 8, अहेरी 5, धानोरा 1, कुरखेडा 5 आणि वडसा 4 जणांचा समावेश आहे.

तर नवीन 36 बाधितांमध्ये गडचिरोली 24 यात आयटीआय चौक 2, एक पोलीस, नवेगाव 6, माडेतुकूम 1, फुले वार्ड 1, अपलवार रूग्णालय 1, नागपूर येथे जिल्हयातील 1 बाधित, महिला रूग्णालय 3, नगरी 1, इंदिरा नगर 2, पोलीस कॉलनी 1, सोनापूर कॉम्लेुणक्स 1, लांझेडा 1, रेकेगाव 1, विवेकानंदनगर 1 यांचा समावेश आहे. जणाचा समावेश आहे. वडसा येथील 1, भामरागड 1, चामोर्शी 4 यात भेंडाळा 2, चापळवाडा 1, आष्टी 1 अशा रूग्णांचा समावेश आहे. आरमोरी 1, अहेरी 3 यात आलापल्ली 2 व बोरी 1, सिरोंचा 1, कुरखेडा येथील अंजून टोला 1 अशी जिल्हयात 36 नवीन बाधितांची नोंद झाली.

यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 454 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 1993 रूग्णांपैकी 1526 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात सक्रिय रूग्णांपैकी सद्या आसीयू मध्ये ऑक्सीजन लावलेल्या 10 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 9 जणांवर आयसोलेशन ऑक्सीजन बेडवरती उपचार सुरू आहेत. सद्या व्हेंटीलेटरवरती एकही रूग्ण नसल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.