कृषी सुधार विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचेच- संजय टेंभरे.

 * शेतकर्‍यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये

0
50

गोंदिया- केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधार विधेयक मंजूर केले असून या विधेयकामुळे शेतकर्‍यांना निश्चितच फायदा होणार आहे. सदर विधेयक शेतकर्‍यांच्या हितांचे असून शेतकर्‍यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये व विधेयक संदर्भातील संभ्रम दूर सारा, असे आवाहन भाजप जिल्हा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधार विधेयक मंजूर केले. मात्र सदर विधेयक हे शेतकरी विरोधी असल्याचा कांगावा विरोधी पक्ष करीत आहे. वस्तुतः सदर विधेयकामुळे शेतकर्‍यांना आपला शेतमाल कोणत्याही भागात विकण्यास परवानगी मिळाली आहे. शेती क्षेत्रात खासगी कंपन्या माल विकत घेणार असल्याने शेतकर्‍यांच्या पिकाच्या किमतीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे गाव खेड्यातील शेतकरी जेव्हा आपला माल विकण्यासाठी धान किंवा भाजी मंडी मध्ये जात तेव्हा त्यांना आधी अडत कापावी लागत होती. हे अडतिया शेतकर्‍यांच्या मालाची किंमत ठरवत असत. आता मात्र त्यापासून शेतकर्‍यांची सुटका झाली आहे. कंत्राट शेती पद्धतीने शेतकरी आता कर्जाच्या विळख्यात सापडणार नाही. कंपनीला ज्या प्रकारचे पीक हवे असेल त्या पिकाचे उत्पादन घ्यायचे व यासाठी लागणारा भांडवल आधीच घेऊन त्या आधारे शेती करता येऊ शकते. त्यामुळे सदर कृषी विधेयक हे शेतकर्‍यांच्या हिताचे असून या विधेयकामुळे शेतकर्‍यांना निश्चितच आपला जीवनमान उंचावण्यासाठी फायदा होणार असल्याचा आशावाद भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे.