अनिहानगरातील रस्त्यावरील खड्यांमुळे अपघाताची शक्यता

0
171

आमगाव,,दि.24ः-बनगाव येथील अनिहानगरपरिसरातील कालव्याच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने खड्यात रस्ता शोधण्याची वेळ नागरिकांना आली आहे.तर पावसाळ्यात या खड्यात पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.
बनगाव येथील अनीहानगर ते कामठा मार्गे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहे. सदर मार्ग बाजार समिती, पंचायत समिती, पशू वैदकिय दवाखाना तसचे भाजीपाला बाजाराकडे जाणारा मार्ग आहे,
या ठिकणाहून सेकडो शेतकरी, मजूर, इतर नागरिक येजा करतात. रस्त्यावरील जागो जागी असलेले खड्यात पाणी साचून राहत असल्याने प्रवाश्यांचे वाहन तलाव स्वरूपी खडयात पडून जखमी होतात हे नित्याचेच झाले आहे , रस्त्या लगतच कालवा वाहून जात असतो प्रवासी खडयात पडून या कालव्यात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भी अनेकदा नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांना सांगून ही लक्ष दिले नाही. येथील कर्मचार्‍यांवर कुणाचे वचक नसल्याने ते मेरी र्मजी सारखे वावरतानीं दिसून येतात. या मार्गावरील नागरिक न. प. चे कर वेळेवर भरतात तरीदेखील विद्युत खांबांवर दिवे नाही , कचरा पेटी नाहीं अश्या अनेक समस्यांनी अनिहा नगर ग्रासलेला आहे. येथील समस्यांचे निवारण करण्यासाठी कोणी देवदुत येणार का? याची वाट नागरिक बघत आहेत.