गडचिरोली,दि.24ः तक्रारदाराच्या वडिलाचे औषधोपचारासंबंधी बिलाचे धनादेश काढून देण्यासाठी १ हजाराची लाच स्विकारणार्या बांधकाम विभागाच्या लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ सप्टेंबर रोजी रंगेहाथ अटक केली. बाबाराव शंकरराव बाहे (५६) असे असे लाचखोर लिपीकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली सार्वजनीक बांधकाम विभाग गडचिरोली येथे कार्यरत लिपीक बाबाराव बाहे यांनी तक्रारदार याच्या वडिलाच्या औषधोपचाराचे बिलाचे धनादेश काढून देण्यासाठी १ हजाराची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. एसीबीने सदर लाच स्विकारल्या प्रकरणी लिपीकावर गुन्हा दाखल केला.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस निरीक्षक यशवंत राऊत, मोरेश्वर लाकडे, प्रमोद ढोरे, नत्थु धोटे, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकार, किशोर ठाकुर, गणेश वासेकर, तुळशीराम नवघरे यांनी पार पाडली. पुढील तपास एसबीचे पोलिस निरीक्षक यशवंत राऊत करीत आहेत.