शरदचंद्र पवार कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व्याहाड खुर्द बंद करण्याचे आदेश

0
168

सावली,दि.24–तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील शरदचंद्र पवार विद्यालय येथे अनधिकृत चालू असलेले कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय हे सन 2020- 21 पासून बंद करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक, शिक्षण विभाग नागपूर यांच्या आदेशाने शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. चंद्रपूर यांनी सदर कॉलेज बंद करण्याचे आदेश संबंधित गटशिक्षणाधिकारी सावली व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना दिलेले आहे.
तसेच सन 2020 -21 मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित न करण्याचे निर्देश मुख्याध्यापक शरदचंद्र पवार उच्च माध्यमिक विद्यालय व्याहाड खुर्द ता.सावली.जि.चंद्रपूर यांनी दिलेले असून सदर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले अकरावी, बारावी चे विद्यार्थी स्थानिक कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात समायोजित करण्याची कारवाई करावी.
तसेच या पलीकडे सदर शरदचंद्र पवार कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व्याहाड खुर्द येथे कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. याची पालकांनी खबरदारी घ्यावे असे म्हटले आहे.