सर्पमित्रांनी दिले साडेआठ फुटाच्या अजगराला जीवनदान

0
254

अर्जुनी मोरगाव,दि.24ः- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन परिसरात कार्यरत हमालांना साप असल्याची जाणीव झाली.परिसराची पाहणी केली असता त्यांना भला मोठा अजगर दिसून आला.बाजार समितीचे प्रभारी सचिव संजय सिंगनजुडे  गोडाऊनकडे धाव घेत अजगराची माहिती मिळताच स्थानिक सर्प मित्र राहुल लाडे,मुकेश पवार,अनुराग दुणेदार आणि छत्रपाल कापगते यांना प्राचरण केले.
सर्प मित्राणी त्या अजगर सापाला पकडले.सदर अजगर साडे आठ फूट लांबीचा असल्याची माहिती सर्प मित्र राहुल लाडे यांनी दिली.या अजगराला नजीकच्या जंगल शिवारात सोडण्यात आले. यावेळी बाजार समितीचे कर्मचारी मंगेश डोये, ऋषि पर्वते, लालबहादूर वाळवे,कालिदास सोनवणे,केवळराम शहारे, शिवा हातझाडे आणि मजूर उपस्थित होते.