तब्बल ३०४ रुग्ण झाले कोरोनामुक्त ;नवे ३०५ पॉझिटिव्ह रुग्ण

0
728

गोंदिया दि.२४– जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण औषधोपचारातून बरे होण्याची संख्या साडेतीन हजाराच्या वर पोहोचली आहे. आज उपचार घेत असलेल्या ३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.आतापर्यंत जिल्ह्यातील ३५३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. नव्याने ३०५ कोरोना बाधित रुग्ण आज आढळून आले आहे. तर उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज जे ३०५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १८९ रुग्ण आढळले आहे. यामध्ये गोंदिया शहरातील शारदानगर येथील दोन, सेल टॅक्स कॉलनी येथील दोन, गोंदिया शहरातील इतर भागातील १५ , मामा चौक येथील सहा,काटी येथील सहा,बद्रीप्रसाद वार्ड येथील एक, कोल्हारगाव येथील एक, सिव्हिल लाईन येथील दहा,विजयनगर येथील एक, दुर्गा चौक येथील एक,देशबंधू वार्डातील दोन,गुरुनानक वार्डातील चार, महावीर कॉलनी येथील तीन,कटंगीकला येथील दहा, सिंधी कॉलनी येथील सहा, छोटा गोंदिया येथील तीन,पाल चौक येथील एक, मनोहरभाई वार्ड येथील दोन, मरारटोली येथील सहा,गांधी वार्ड येथील एक, सूर्यटोला येथील एक, बाजपेयी येथील एक,चंद्रशेखर वॉर्ड येथील दोन, हरीकाशीनगर येथील तीन, गोविंदपुर येथील बारा,भीमनगर येथील चार,सिंगलटोली येथील एक, श्रीनगर येथील चार,कुंभारटोली येथील चार, रविशंकर वार्ड येथील एक, माताटोली येथील दोन, हनुमान नगर येथील एक, सावराटोली येथील एक, गणेशनगर येथील चार, सावली येथील एक, शास्त्री वार्डातील सात, संजयनगर येथील एक, रेलटोली येथील दोन, कुडवा येथील चार, अयोध्यानगर येथील एक, नागरा येथील एक, टिबीटोली येथील एक, फुलचूर येथील सात,कामठा येथील तीन, वर्धमान वार्डातील तीन,चांदणीटोला येथील एक, रामनगर येथील एक, न्यू लक्ष्मीनगर येथील दोन, पुनाटोली येथील एक, गजानन कॉलनी येथील सात, तांडा येथील दहा ,पंचायत समिती कॉलनी येथील एक,मेन रोड गोंदिया येथील दोन, रिंग रोडवरील तीन,इसरका मार्केट येथील दोन,गंज वार्डातील एक, रतनारा येथील एक, राजेंद्र वार्डातील एक, धापेवाडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

तिरोडा शहरातील शास्त्री वार्ड, जुनी बस्ती,स्टेशन रोड ,अदानी,बघोली, कवलेवाडा, पांजरा,दांडेगाव व लोधीटोला येथील प्रत्येकी एक रुग्ण. गोरेगाव तालुक्यातील धानुटोला येथील सहा,कलपाथरी येथील एक, अस्सल लपाणी येथील दोन,मधीरटोला येथील तीन,रामाटोला येथील तीन,गोरेगाव येथील दोन, हिरापूर येथील सहा, दवूटोला येथील दोन,, कुऱ्हाडी येथील दोन, तीमेझरी येथील एक,बागडबंध येथील एक व चोपा येथील एक रुग्ण.आमगाव तालुक्यातील पाऊलदवणा येथील एक, खोलगड येथील एक,रिसामा येथील दोन, आमगाव शहरातील आठ,ननसरी येथील एक,मुंडीपार येथील एक,भजेपार येथील एक, धावडीटोला येथील एक, बनगाव येथील एक व पदमपुर येथील एक रुग्ण. सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथील वीस,सालेकसा येथील चार, दरेकसा येथील तीन, पातरी येथील चार, नवागड येथील एक, कारुटोला येथील चार,लटोरी येथील एक व भानुटोला येथील एक रुग्णाचा समावेश आहे.देवरी शहरातील सात व घोनोडी येथील तीन, सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील एक, बाहेर जिल्ह्यातील यापैकी बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी येथील दहा रुग्णांचा यामध्ये हे समावेश आहे.

जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-३२८४ तिरोडा तालुका-७७८ गोरेगाव तालुका-२५३, आमगाव तालुका- ३८६, सालेकसा तालुका-२४०, देवरी तालुका-२१५, सडक/अर्जुनी तालुका- १६२ अर्जुनी/मोरगाव तालुका-२१७ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-८८ रुग्ण आहे. असे एकूण ५६२३ रुग्ण बाधित आढळले आहे.

आज ज्या ३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका-१९०, तिरोडा तालुका-६७, गोरेगाव तालुका-०८ आमगाव तालुका-०९, सालेकसा तालुका-७, देवरी तालुका-४, सडक/अर्जुनी तालुका-८ व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील आठ आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत ३५३३ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-२१६१, तिरोडा तालुका- ५०६ गोरेगाव तालुका-१२३, आमगाव तालुका- २१७, सालेकसा तालुका-९४, देवरी तालुका-१२४, सडक/अर्जुनी तालुका-१३८, अर्जुनी/मोरगाव तालुका-१५७ आणि इतर-१३ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या २०१० झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-१०८०, तिरोडा तालुका- २५८, गोरेगाव तालुका-१२८ आमगाव तालुका-१६३, सालेकसा तालुका- १४४, देवरी तालुका-९०, सडक/अर्जुनी तालुका- २१, अर्जुनी/मोरगाव तालुका-५८ आणि इतर-६८ असे एकूण २०१० रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

क्रियाशील रुग्णांपैकी ८९० रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-४६६, तिरोडा तालुका-११०, गोरेगाव तालुका-६८, आमगाव तालुका-२९, सालेकसा तालुका-९०, देवरी तालुका-६८, सडक/अर्जुनी तालुका-९, अर्जुनी/मोरगाव तालुका-५० व इतर ०० असे एकूण ८९० क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.

आतापर्यंत ८० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-४३, तिरोडा तालुका-१४, गोरेगाव तालुका-२, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-२, देवरी तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-२ व इतर ठिकाणच्या सात रुग्णांचा समावेश आहे.

ज्या तीन कोराना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.यामध्ये काल रात्री ५० वर्षीय रुग्ण राहणार न्यू लक्ष्मीनगर,गोंदिया यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.९३ वर्षीय रुग्ण राहणार अंगुर बगीचा रोड, गोंदिया यांचा काल रात्री खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला व आज २५ वर्षीय रुग्ण राहणार साकोली यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण २७८९९नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २०९७२ नमुने निगेटिव्ह आले. तर ३८१० नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १९७५ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ११४१ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात २७ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ३९२ व्यक्ती अशा एकूण ४१९ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २२११७ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये २०१३० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. १९८७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १६८ चमू आणि १४५ सुपरवायझर, १४५ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-७, आमगाव तालुका- १७,सालेकसा तालुका-११, देवरी तालुका-३५, सडक/अर्जुनी तालुका-११, गोरेगाव तालुका-२६, तिरोडा तालुका-३२ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-६ असे एकूण १४५ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेत सहभागी व्हावे.तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.