32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र येराळावाणी ९१.२ एफ,एम व युनिसेफचा कलाविष्कार या स्पर्धेचा निकाल जाहीर

येराळावाणी ९१.२ एफ,एम व युनिसेफचा कलाविष्कार या स्पर्धेचा निकाल जाहीर

0
133

सांगली,दि.२८--येरळा प्रोजेक्टस् सोसायटी ,सांगली द्वारा संचलित रेडियो येरळावाणी ९१.२ एफ.एम युनिसेफ(UNICEF) आयाणि SBC3 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ऑन लाइन स्पर्धा घेण्यात आलेल्या कोरना कलाविष्कार या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या स्पर्धेसाठी श्रोत्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला.

सर्व ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये चित्रकला, निबंध, रांगोळी, आणि महिलांसाठी रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे, लहान गट चिञकला अंकुश मगदूम प्रथम , स्वरा संग्रामे द्वितीय तासगाव,अक्षरा कांबळे व शमा मोटे तृतीय बाबरवस्ती , श्रावणी देवके नांदेड व प्रथमेश कांबळे उत्तेजनार्थ तर मोठा गट मध्ये प्रविण ओतारी प्रथम , प्रियंका शिंगे द्वितीय ,मलकारी तिले तिसरा, तर लावण्या मोटे बाबरवस्ती व सजीवंनी सोनलकर उत्तेजनार्थ , व रांगोळी खुल्या स्पर्धा गट मध्ये प्रशांत कांबळे प्रथम ,स्नेहा कोळी संख द्वितीय ,नंदकुमार ओतारी नांदेड तृतीय,गीताजंली गडदे को. बोंबलाद व सुनिता पवार वाळवा उत्तेजनार्थ . निंबध स्पर्धा लहान गट मध्ये श्रावणी कोलप अंकली, प्रथम ,स्वरा मगदूम द्वितीय व मोठा गट मध्ये सनयोगिता सोनलकर जत,प्रथम ,इश्वरी वाली जत व बापुराव कुंडले जालिहाळ द्वितीय ,गुरुसिद्धा तमदादी तृतीय,प्रतिभा शिंगे सांगली व मलकारी तिले लवंगा उत्तेजनार्थ .खुला मोठा गट निंबध स्पर्धा मध्ये पोपट निकम आरग प्रथम ,अंनिस जोशी मिरज द्वितीय ,हर्षद सुतार नरवाड तृतीय,अविना कांबळे व अक्षता होनखंडे संख उत्तेजनार्थ.रेसिपी मध्ये विद्याराणी काळे करेवाडी तिंकोडी प्रथम ,मनिषा नरळे द्वितीय ,पुजा नरळे गोंदळेवाडी तृतीय
कलाविष्कार या स्पर्धेचा विजेता सर्वांचे अभिनंदन व या स्पर्धेसाठी राज्यातील नांदेड,सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून विशेष नंबर पटकाविले आहेत.

जालीहाळ परिसरातील श्रोत्यांच्या कडून या स्पर्धेसाठी सर्वात जास्त प्रवेशिका आल्या, या स्पर्धेमध्ये इतर पारितोषिकांच्या बरोबर खास विशेष पारितोषिक बाबरवस्ती जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वाघमारे दिलीप यांना देण्यात आलेले आहे.हा पारितोषिक वितरण कार्यक्रम, कोरोनाची सर्व नियमावली पाळून जालिहाळ येथील येरळा कॅम्पसमध्ये बुधवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संपन्न होणार आहे. उदय गोडबोले ,केंद्र प्रमुख
येरळावाणी ,क्षितिजा केळकर, केंद्र समनव्यक येरळावाणी सानिका खरे
बेरार टाइम्सशी सांगितले आहे.

यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांच्या मुलाखती येरळा वाणी वरून प्रसारित केल्या जाणार आहेत. तरी या कार्यक्रमाला आपण सर्व श्रोते तसेच माझी शाळा या ग्रुप वरील शिक्षक,आशा अंगणवाडी सेविका, पदाधिकारी व जत परिसरातील विद्यार्थी यांनी चांगला प्रतिसाद देऊन कोरोना विरुद्ध लढ्याची ही चळवळ सर्वत्र मनामनात पोचवल्याबद्दल येरळा वाणीच्या वतीने आभार.व्यक्त केले.
सर्व स्तरातून विजेताचे कौतुक होत आहे.