35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राष्ट्रीय देश शेतकऱ्यांचा रोष असतानाही ३ कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची...

शेतकऱ्यांचा रोष असतानाही ३ कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

0
318

blank

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या तीन कृषी विधेयकांविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र असे असतानाही आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केली असून त्यांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या कायद्याबाबत महाराष्ट्र सरकार ठाम असून हे विधेयके राज्यात लागु न करण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेत आहे.

लोकसभेत मंजूर झालेले कृषी विधेयक नुकतेच राज्यसभेत मंजूर करण्यात आले. मात्र यावेळी विरोधकांनी या विधेयकाविरोधात नाराजी व्यक्त करत गदारोळ घातला. मात्र विरोधकांचे म्हणणे न ऐकून घेताच सत्ताधार्यांनी आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करून घेतले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला. तसेच दुसरीकडे ही विधेयकं शेतकर्‍यांंच्या हिताची नसल्याचे म्हणत अजुनही देशभ विरोध होत आहे. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी स्वाक्षरी करुन मान्यता दिली आहे. या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. यावरुनच भाजपाचा (BJP) मित्र पक्ष शिरोमणी अकाली दल (Akali Dal) याने NDA मधुन आपला सहभाग देखील काढुन घेतला आहे

blank