
गोंदिया ता. ८: गोरगरिबांच्या सेवेसह सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. अनंत शिरसाट यांनी देहदानाचा संकल्प केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हमीपत्र भरून दिले.
डॉ. अनंत शिरसाट उच्चविद्या विभूषीत आहेत. त्यांनी २७ वर्षे जिल्ह्यातील विविध शासकीय वैद्यकीय रुग्णलयांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. ते गतवर्षी सेवानिवृत्त झाले. शासकीय सेवेबरोबर समाजातील रंजल्यागांजल्यांच्या मदतीकरिता ते परिचीत आहेत. शाहू, फुले आंबेडकर चळवळीत ते अग्रेसर आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून डॉ. शिरसाट यांनी मरणोत्तर देहजानाचा संकल्प केला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हमीपत्र भरून दिले. मृत्यूनंतर आपल्यावर कसल्याही प्रकारचे धार्मिक संस्कार करण्यात येवू नये. बुद्ध धर्माप्रमाणे देखील संस्कार होवू नयेत. बुध्दम शरणम् गच्छामि देखील म्हणू नये, असा संकल्प त्यांनी घेतला. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.





