33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home रोजगार/व्यापार ‘सैन्य दल व पोलीस भरती मार्गदर्शन’ विषयावर १६ ऑक्टोबर रोजी मोफत वेबीनारचे...

‘सैन्य दल व पोलीस भरती मार्गदर्शन’ विषयावर १६ ऑक्टोबर रोजी मोफत वेबीनारचे आयोजन

0
195

वाशिम, दि. ०९  : जिल्ह्यातील सुशिक्षित युवक, युवतींना सैन्य दल तसेच पोलीस विभागात शासकीय नोकरीची संधी प्राप्त व्हावी, तसेच परीक्षेचे स्वरूप, शारीरिक चाचणी व इतर बाबींची माहिती प्राप्त व्हावी, या उद्देशाने ‘सैन्य दल व पोलीस भरती मार्गदर्शन’ या विषयी शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी ३ ते ४ वा. या वेळेत मोफत वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित या वेबीनारमध्ये भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसचे समन्वयक डॉ. अनिल जाधव मार्गदर्शन करणार आहेत.

वेबीनारमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत ९६६५५२५६५१ या क्रमांकावर व्हाटसअप रिक्वेस्ट पाठवून गुगल लिंक प्राप्त करून घ्यावी, सदर लिंकवरील अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

blank