
गोदिया,दि.16ःशहरातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा,त्या योजनेपासून वंचित राहू नये याकरीता त्यांच्या घरापर्यंत पोचून माहिती देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या संकल्पनेतील गृहभेट आपुलकीची या कार्यक्रमाच्या माध्यमातून तहसिल कार्यालयाच्या कर्मचार्यांनी भेटी देत माहिती दिली.
गोंदिया तहसिल कार्यालयांतर्गत येत असलेल्या गोंदिया नगर परिषद क्षेत्रात संजय गांधी योजना शाखेच्या वतीने मोहीम राबविण्यात येऊन संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या अनुषंगाने प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोचून त्यांच्याकडून विशेष सहाय्य योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले.वृद्ध तसेच दिव्यांग व्यक्ती जे कोरोना सारख्या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये घराबाहेर देखील निघू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या गृहभेट आपुलकीची संकल्पनेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.सदर संकल्पना ही अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येत असून जनतेकडून त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.या मोहिमेत नायब तहसिलदार आर.एन.पालांदूरकर,अव्वल कारकून आशिष रामटेके,महसूल सहाय्यक जि.एस.खान सहभागी झाले होते.