आयडॉलला युजीसीची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी मान्यता

0
128

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला युजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी मान्यता  दिली असून त्यानुसार प्रथम वर्षाचे प्रवेश आयडॉल लवकरच सुरु करणार आहे.

युजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी भारतातील ३३ विद्यापीठांना प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु करण्यास मान्यता दिल्याचे पत्र दि. १२ ऑक्टोबर २०२० रोजी युजीसीच्या संकेतस्थळावर प्रदर्शित झाले. या पत्रानुसार  मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश करण्यास मान्यता मिळाली आहे. यानुसार आयडॉल प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएससी आयटी या पदवीस्तरावरील अभ्यासक्रमासाठी तर भाग १ एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी व एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच सुरु केले जाणार आहेत.

 युजीसी-डीईबीने  मागील वर्षी आयडॉलच्या १५ अभ्यासक्रमाला मान्यता दिली होती, यानुसार मागील वर्षी जुलैच्या सत्रामध्ये ६७,२३७ तर जानेवारी सत्रामध्ये ९२० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते.

२०२०-२१ या  शैक्षणिक वर्षात आजपर्यंत  पदवीस्तरावरील द्वितीय,  तृतीय आणि पदव्युत्तर स्तरावरील भाग २ साठी २५,६९७ विद्यार्थ्यांनी  प्रवेश घेतला आहे. या प्रवेशाची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२० आहे.

आयडॉलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त  आयडॉलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अंबुजा साळगावकर होत्या. तर अध्यक्षस्थानी आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर होते.