पक्ष बळकटीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे : माजी आमदार राजेन्द्र जैन

0
364

देवरी,दि.28ः-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य नागरिकांच्या विचाराचा पक्ष असून तो तळागळापर्यंत पोचविण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांने प्रामाणिक कार्य करावे.सोबतच महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात येत असलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोचवून येणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी दिले.
या बैठकीत तालुक्यातील अनेक कार्यकर्तानी खासदार प्रफुल पटेल यांचा नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमधे प्रवेश केला.यात चिचगड जिल्हापरिषद गटामधील सिमरण जांगडे, माधुरी यादवजी शहारे, अनीक्षा पठाण, निर्मला मेळे, देवकाबाई पिहदे, गौतम वैद्य तसेच देवरी शहर येथे कोमल मुकेश खरोले, प्रियंका सलामे, प्रतिभा पी देशपांडे, सुबोध पी देशपांडे यांनी प्रवेश केला.बैठकीला नरेश माहेश्वरी,बाजार समितीचे सभापती रमेश ताराम,गोपाल तिवारी,इंदल अरकरा,देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सि.के.बिसेन,महिला तालुकाध्यक्ष पारबताबाई चांदेवार, भैयालाल चांदेवार,भाष्कर धर्मशहारे,हरीभाऊ राऊत,अमरदास सोनबोईर, योगेश देशमुख, बबलु भाटीया, मनिष मोटघरे , नेमीचंद आंबिलकर,माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन,शहर अध्यक्ष मुकेश खरोले,अर्चनाताई ताराम,दिलीप दुरुगकर, मनोहर राऊत, सुजितजी अग्रवाल, तेजराम मडावी, रवी बडवाईक व मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.