
नागपूर,दि.22ः-उमरेड कर्हांडला -पवनी अभयारण्यातील कंपार्टमेंट क्रमांक1452/1 मध्ये आज रविवारला एक मादी वाघीन मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.या मादी वाघीनीचे वय अंदाजे 3-4 वर्ष सांगितले जात आहे.माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोचले असून मृत वाघिणीचा तपास करुन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करणार आहेत. डॉ. चेतन पाटंड, डॉ सय्यद बिलाल आणि डॉ एल ए खान एलडीओ नंद , एनटीसीएचे प्रतिनिधी म्हणून बीएनएचएस आणि सहाय्यक डॉ वसंत कहलकर, डीएफओ बोर संजय करकरे आदी उपस्थित होते.





