31.4 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खमारी व फूलचूर जिल्हा परिषद बूथ कमिटीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खमारी व फूलचूर जिल्हा परिषद बूथ कमिटीची बैठक

0
185

blank

गोंदिया,दि.१३ः- तालुक्यातील खमारी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कमेटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ताची बैठक महात्मा ज्योतिबा फुले समाजभवन, खमारी येथे माजी आमदार राजेंद्र जैन,सुरेश हर्षे,केतन तुरकर,अखिलेश सेठ,रवी पटले,जगदीश बहेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली झाली.फुलचूर जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक पाटील लॉन, आंबाटोली फुलचूर येथे माजी आमदार राजेंद्र जैन,कुंदन कटारे, केतन तुरकर,केवल बघेले,निरज उपवंशी,अखिलेश सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

महायुती सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडली बहिन योजन, मुलींना उच्च शिक्षणात १०० टक्के फी माफ, शेतकऱ्यांना वीज माफ या सारख्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घेता येईल यासाठी कार्यकर्त्यांनी सहयोग करावा. असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटन बांधणी करण्यासाठी बैठक घेण्यात येत असून जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व गावामध्ये प्रत्येक बूथवर क्रियाशील लोकांची कमेटी बनविणे कमिटीमध्ये महिला, युवक व सर्व घटकांच्या नवीन लोकांना जोडण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, प्रत्येक गावांतील सक्षम बूथ कमेटी तयार करून संघटन मजबूत करने या वरच चर्चा करण्यात आली. खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत आपण सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहोत अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यानी व्यक्त केली.

सर्व राजेंद्र जैन, सुरेश हर्षे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, रवी पटले, जगदीश बहेकार, सुनील ब्राह्मणकर, तिलक पटले, प्रकाश गायधने, सुनील पटलॆ, शैलेश वासनिक, राजेश तावाडे, कपिल बावनथडे, चैत्राम उके, मनोहर चव्हाण, राजेश मासिरकर, पवन धावडे, हरिचंद मेंढे, सदाशिव मेश्राम, भाऊलाल खैरवार, नरेंद्र रामटेके, श्रीराम निखाडे, विजय भांडारकर, शुभम शिवणकर, सचिन किरणापुरे, अशोक बावनथडे, बंशीधर अग्रवाल, कुणाल बावनथडे, कुलदीप गायधने, राजेश मेंढे, अखिलेश शेंडे, किरण बारापात्रे, दीपिका धावडे, लाजवंता तावाडे, आशा शिवणकर, वंचित गायधने, माधुरी बोहरे, भाग्यश्री लांडेकर, दुर्गा पाथोडे, मनोहर गुढगे,गंगाराम कापसे, विनय रामटेक्कर, अनिल मडावी, डोमेश्वर तुरकर, रमेश रहांगडाले, सुनील पटले, शैलेश वासनिक, अनिल मोहबे , हौसलाल रहांगडाले, जितेश बावणे, अल्पेश उके, कविसाव बिसेन, असंगर अली, सुरजलाल बिसेन, जासवंत अंबुले, सुनील मौदेकर, रमेश वाघाडे, कन्हय्या रहांगडाले, दुर्गा राऊत, शोभा राऊत, प्रेमीला राऊत, भुजा भुजाळे, रंजित बघेले, कार्तिक लिल्हारे, कार्तिक कटरे, वीरेश हरिणखेडे, कारण लिल्हारे, लेखन बिसेन, राज हरिणखेडे, जुगनू रंगारी, रविकांत नागपुरे, भाविक रंगारी, माया ठाकरे, हिमांशू राऊत, मनोज हेमने, योगेश डोये, रवी शेंदरे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.