
भंडारा दि.04 : कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता विभागामार्फत येत्या 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या अनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्तांनी रिक्त पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर STATE LEVEL MEGA JOB FAIR येथे करुन आपल्या आवश्यकते नुसार अप्लाय केलेल्या बेरोजगार उमेदवारांची उपलब्ध असलेली यादी ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करावी.
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर STATE LEVEL MEGA JOB FAIR येथे ऑनलाईन अप्लाय करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा येथे किंवा त्यांचे 07184-252250 या दुरध्वनी क्रमांकावर तसेच [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.




