33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ महामानवाला समता सैनिक दलाची सलामी…अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला महापरिनिर्वाण दिन

महामानवाला समता सैनिक दलाची सलामी…अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला महापरिनिर्वाण दिन

0
62

गोंदिया,दि.06:- संविधान मैत्री संघ, समता सैनिक दल व सर्वसमाज जयंती समिती तर्फे स्थानीक भीमघाट, पांगोली नदी परिसरात बाबासाहेबांचे अस्थीकळस असलेल्या स्मारकासमोर महामानवाला सलामी देऊन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संविधान मैत्री संघ संयोजक अतुल सतदेवे, संरक्षक पौर्णिमाताई नागदेवे, सुशील वनकर, गौतमा चिंचखेडे, समता सैनिक दलाचे कमांडर राजहंस चौरे, सर्वसमाज जयंती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी, मीलन चौधरी, कुलदीप पारधी, गुलशन बावनथडे, निखिल पारधी, युवा बहुजन मंच चे सुनिल भोंगाडे, रवि भांडारकर, भारतिय बौद्ध महासभा तर्फे भीमराव बनसोड, मिलिंद गजभिये, तुकाराम भालाधरे, मुकेश माने, राजेश मेश्राम, संध्या बनसोड, ओबिसी संघर्ष कृती समितीचे कैलाश भेलावे, मुस्लिम मायनोरिटी ट्रस्ट चे महताब भाई खान व विविध मित्र सोबती संघटनांचे प्रमुख- सक्रीय कार्यकर्ते सदर अभिवादन सलामी कार्यक्रमाला उपस्थित राहुन समाजहितार्थ सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला अधिक बळकटी येण्यासाठी बुद्ध-फुले-शाहू आंबेडकरी विचारांचा, तत्वज्ञानाचा सार आपल्या कार्य कर्तुत्वातुन समाजात रूजविण्याचे कार्य आपण सतत करत राहू याचा दृढ संकल्प करण्यात आला तसेच सामुहिक त्रिशरण पंचशील व संविधान प्रास्ताविकेचा वाचन करण्यात आला.

▪️डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमघाट पांगोली नदी परिसरात असलेल्या अस्थीकळस स्मारका मुळे गोंदिया परिसरातील नागरिकही येथे अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने पोहोचतात. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन कोविड 19 ची परिस्थिती लक्षात घेता साजरा करण्यात आला. या संदर्भात शासनाने महापरिनिर्वाण दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी जारी केलेल्या नियमांचे पालन करून जिल्ह्यातील विविध संघटनांनी कोविड 19 च्या नियमांचे पालन केले आणि महापरिनिर्वाण दिन अत्यंत साधेपणाने साजरा केला.