34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home रोजगार/व्यापार संसाधन व्यक्ती पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

संसाधन व्यक्ती पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
90

वाशिम, दि. ०८ : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न खाद्य उद्योग उन्नयन योजना (पीएमएफएमई) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची तयार करावयाची आहे. त्यासाठी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातील अर्ज २१ डिसेंबर २०२० पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

संसाधन व्यक्ती पदासाठी नामांकित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, संस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकीमधील पदविका अथवा पदवी असणे आवश्यक आहे. तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन, वृद्धी, नवीन उत्पदान विकसित करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भात ३ ते ५ वर्षाचा अनुभव असावा. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता, पारिश्रमिक मानधन व इतर अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर पदासाठी संस्था पात्र असणार नाही, असे श्री. तोटावार यांनी कळविले आहे.

blank