
सातारा दि.6 -: जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालयात साध्या पद्धतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार दिपक शिंदे, पत्रकार राहुल तपासे, पत्रकार तुषार तपासे, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी राहुल पवार आदींनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.




