33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत इतकं हे प्रचंड दुःख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत इतकं हे प्रचंड दुःख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
59

blank

भंड़ारा,दि.10ः-भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूकक्षात जीव गमावलेल्या बालकांच्या कुटुबिंयाचे आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भोजापूर येथे जाऊन दुर्दैवी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत इतकं हे प्रचंड दुःख आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील शीशू केअर येथे दहा नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव भंडारा जिल्हा दौऱ्यावर या अनुषंगाने त्यांनी भोजापूर येथील पिडित बेहरे कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.विशेष म्हणजे बेहरे कुटुंबियातील नवजात मुलगी गेल्या दोन महिन्यापासून वजन कमी असल्यामुळे शिशु केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. आज न उद्या ती घरी परत येईल या आशेवर बेहरे कुटुंबिय होते.मात्र काळाने घात केल्यामुळे त्या नवजात बालिकेचा जिल्हा सामान्य रूग्णालयातील अग्नीतांडवात गुदमरून मृत्यू झाला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांत्वना भेट दिली,त्यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले व इतर मान्यवर सोबत होते.नंतर ते भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

blank