42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता भरनोलीच्या जंगलात पेरून ठेवलेले स्फोटके जप्त

भरनोलीच्या जंगलात पेरून ठेवलेले स्फोटके जप्त

0
336

blank

गोंदिया,दि.१०ः-येत्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान दहशत निर्माण करुन घातपात घडविण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी पेरलेले स्पोटके व साहित्य गुप्त माहितीच्या आधारे शोध घेत ताब्यात घेण्यात आले आहेत.जिल्ह्यातील केशोरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या भरनोलीच्या जंगलपरिसरात हे साहित्य लपवून ठेवण्यात आले होते.यासंदर्भातील माहिती मिळताच सी ६० कमांडो पथक,भरनोली दुरक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी व बॉम्बशोधक पथकाने जंगलात सर्च मोहिम राबविली असता बोरटोला ते धानोरी पहाडादरम्यानच्या एका भागात दगडाच्या बाजूला संशयास्पद वस्तू आढळून आल्याने श्वानपथकाच्या मदतीने पाहणी केली असता स्पोटके असल्याचे आढळून आले.त्या एका जर्मन डब्यात लोखंडी खिळे,काच.वायर,काळीस्पोटक पावडर असे साहित्य नक्षल्यानी घातपाताच्या उद्देशाने लपवून ठेवली होती,ते साहित्य ताब्यात घेत केशोरी पोलीस स्टेशन येथे नक्षलवाद्याविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय अधिकारी जालींदर नालकुल हे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्व पानसरे व अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पार पडली.

blank