मुंडेंवर आरोप करणार्‍या महिलेविरोधात भाजप नेत्याने केली पोलिसात तक्रार

0
64

मुंबई–राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असे त्यांचे नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वतरुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
या सर्व घडामोडींमुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट निर्माण होत आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी याच महिलेविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने आपल्याला देखील ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच आता हे प्रकरण वेगळे वळण घेताना दिसत आहे.
२0१0 ते २0१५ याकाळात रेणू शर्मा या महिलेने कृष्ण हेगडे यांना संबंध ठेवण्यासाठी वारंवार विचारणा करण्यात आली. ही महिला ब्लॅकमेल करते अशी माहिती समजताच त्यांनी तिच्या हनीट्रॅपपासून वाचण्यासाठी जो प्रयत्न या महिलेने केला तो धुडकावून लावला असा दावा त्यांनी केला आहे. मैत्री व संबंध ठेवण्यासाठी दबाव या महिलेकडून पडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते बळी पडले नाहीत. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची देखील भेट घेतली आहे. वेगवेगळ्या क्रमांकावरून ती फोन व मेसेज करत होती. मी अनेकदा ते नंबर ब्लॉक देखील केले. ही महिला पैसे उकळण्यासाठी असे करत आहे. यावर्षी ६ व ७ जानेवारी रोजी देखील या महिलेने मला विसरला आहात का असा मेसेज केला, अशी माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.