ग्राम पंचायती मतदान प्रक्रियेला सुरूवात

0
21

जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतीच्या सदस्य निवडीसाठी आज सकाळी 7.30 वाजता पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. थंडीचा जोर असल्याने प्रारंभी तुरळक मतदार बाहेर पडताना दिसले दुपारी या संख्येत प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान सुरुवातीला तरी ही शांततेत पार पडत असल्याचे दिसून आले.