अदानी फाउंडेशन ने साजरा केला राष्ट्रीय युवा दिवस

0
44

तिरोडा,दि.१६ःअदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा राष्ट्रीय युवादिवसाच्या निमित्त्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तिरोडा येथे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ जयतवर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व अदानी फाउंडेशन चे श्री बिमुल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या जिवन कार्याबद्दल तसेच त्यांच्या विचारांची माहिती व्हावी यादृष्टीने स्पॉट क्विज कॉम्पिटिशन घेण्यात आली व व योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे शिक्षक श्री बनसोड सर यांनी केले तर आभार श्री उपराडे सर यांनी मानले.
त्यानंतर शासकीय आयटीआय तिरोडा येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनीचे उद्घाटन अदानी पावरचे श्री डॉ विजय गांधेवर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आयटीआयचे श्री सोनटक्के सर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा घेण्यात आली व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले तसेच जास्तीत जास्त युवकांना स्वामी विवेकानंद यांचे विचार माहिती व्हावी तसेच युवा दिवसाचे महत्त्व कळावे या हेतूने ऑनलाइन प्रश्नमंजुषा घेण्यात आली त्यामध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.