शिवसेनेेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने भंडारी कुटूंबाला 1 लाखाची आर्थिक मदत

0
40

अर्जुनी/मोर,दि.१६:- भंडारा येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण अग्निकांडात 10 निष्पाप चिमुकल्याचे जीव गेले. त्यामध्ये तालुक्यातील मोरगांव येथील सुषमा पांडुरंग भंडारी यांच्या नवजात बालिकेचाही समावेश होता.त्यांच्या दुःखात सहभागी होत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी १ लाख रुपयाची आर्थिक मदत केली आहे.त्या मदतनिधीचा धनादेश भंडारी परिवाराला भेट देण्याकरिता भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख नीलेश धुमाळ मार्फ़त शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू ,उपजिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल, जिल्हा संघटक राजू पटले,विकास शर्मा, जिल्हा सचिव संजयसिंह पवार,ऍड बागड़े,तालुका प्रमुख अजय पालिवाल,युवासेना जिल्हा प्रमुख(यवाधिकरी)अश्विनसिंह गौतम,आमगांव तालुका संघटक लाला,नगर सेवक प्रकाश उईके,यादव कुंभरे, अरुण मांडवगने,सामाजिक कार्यकर्ता ओमप्रकाशसिंह पवार, विभाग प्रमुख अजय बड़ोले,तालुका उपयुवाधिकारी छत्रपाल कापगते यांना पाठविले. भंडारी दाम्पत्याना 1लाख रुपये व तालुका शिवसेना अर्जुनी/मोर तर्फे 11 हजार रुपये आर्थिक सहायता देण्यात आली.जिल्ह्यातील प्रत्येक संकटग्रस्त कुटुंबा सोबत शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे वक्तव्य जिल्हा प्रमुख यांच्यातर्फे करण्यात आले.