
सांगली, दि. १९, : कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला असून आज दि. १९ जानेवारी रोजी आरोग्य क्षेत्रातील ४३२ अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली. जिल्ह्यात ९ केंद्रावर कोरोना लसीकरण सुरू असून केंद्रनिहाय लस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे.
शहरी भागात पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली (सिव्हील हॉस्पिटल) -२८, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज – ४०, भारती हॉस्पीटल सांगली – ७०, मिशन हॉस्पीटल मिरज – ३१, शहरी आरोग्य केंद्र हनुमाननगर, सांगली – ५३ याप्रमाणे लसीकरण झाले. तर ग्रामीण भागात उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर – ४७, उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ – ७५, प्राथमिक आरोग्य केंद्र पलूस – ३२, प्राथमिक आरोग्य केंद्र कवलापूर – ५६ याप्रमाणे एकूण ४३२ जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी घेतली कोरोना लस
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय सांळुखे यांनी आज पद्मभुषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली (सिव्हील हॉस्पिटल) येथे स्वत: कोरोनाची लस घेतली. यावेळी डॉ. संजय साळुंखे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कोरोना पासून बचाव करण्यासाठी कोविशिल्ड अत्यंत चांगली लस आहे. तसेच कोविशिल्ड ही लस अत्यंत सुरक्षितही आहे. त्यामुळे जनतेनेही कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लस अधिकारी डॉ. विवेक पाटील व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.




