
औरंगाबाद, 20 जानेवारी-) भावी गुरुजींच्या परीक्षेला आजपासून राज्यात सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे या परीक्षा रखडलेल्या होत्या. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पूणे, प्राथमिक शिक्षण पदविका परीक्षा, डि. एल.एडच्या द्वीतीय वर्षाच्या परीक्षेची आजपासून कोरोनाच्या नियमांचे पालन करत सुरु झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून अंदाजे 1200 विद्यार्थी ही परीक्षा देत आहे. औरंगाबाद शहरात तीन आणि जिल्ह्यात तीन परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरु आहे.11 वाजता पहीला पेपर भारतीय समाज आणि शिक्षण(एस-1) साठी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले. येथे अगोदर थर्मलगण ने तापमान तपासणी करुन नंतर सँनिटायझर हाताला लावून परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात आले. एका हॉलमध्ये फक्त 13 विद्यार्थ्यांना सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन आसन व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी 11 ते 1 वाजेपर्यंत पेपर आहे. एका केंद्रावर फक्त 200 ते 250 विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती केंद्र संचालक एम.एस.गायकवाड यांनी दिली आहे. या परीक्षा 29 जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. शहरात वसंतदादा पाटील महाविद्यालय, पटेल ज्युनिअर कॉलेज, नौखंडा महाविद्यालय व सिल्लोड, वैजापूर, कन्नड येथे परीक्षा केंद्र आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




