32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ थकीत पगारासाठी कोविडयोद्धय़ांचे ‘भिक मांगो’ आंदोलन

थकीत पगारासाठी कोविडयोद्धय़ांचे ‘भिक मांगो’ आंदोलन

0
242

चंद्रपूर,दि.21ः- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५00 कंत्राटी कामगारांचे मागील ६ महिन्यांपासून पगार थकीत आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात काम करणार्‍या कंत्राटी कामगारांनी मार्च २0१९ मध्ये बेमुदत उपोषण केल्यानंतर त्यांना शासनाने किमान वेतन मंजूर केले होते. परंतु तात्कालीन अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांनी निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्यामुळे कामगारांना मागील दोन वर्षांपासून किमान वेतन लागू झालेले नाही.
डॉ. मोरे यांच्याविरुद्ध जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने तीन वेळा कारवाई प्रस्तावित करूनही त्यांच्याविरुद्ध वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे ५00 कंत्राटी कामगारांना मागील दोन वर्षांपासून लागू झालेले किमान वेतन मिळत नसल्याने तसेच सहा महिन्यांपासून पगार थकीत असल्याने कामगारांमध्ये मोठा असंतोष आहे. कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी जन विकास कामगार संघाने अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील प्रशासनाच्या सर्वच पातळीवर अनेकदा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनसुद्धा न्याय मिळालेला नाही. त्यामुळे जन विकास कामगार संघाने आता आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
सहा महिन्यांचा थकीत पगार देण्यात यावा तसेच दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले किमान वेतन तातडीने लागू करण्यात यावे या मागण्यांसाठी उद्या गुरुवारी दि. २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथून ‘भीक मांगो आंदोलन’ सुरू होणार आहे. एक दिवस ह्यकाम बंद करून सर्व कामगार ह्यभीक मांगो आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. पुढील सात दिवसात कंत्राटी कामगारांना त्यांचे सहा महिन्याचे थकीत वेतन देण्याची तसेच किमान वेतन लागू करण्याची मागणी मंजूर न झाल्यास कामगारांचे आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी माहिती जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिलेली आहे.