
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर, मंडल सुरक्षा आयुक्त पंकज चुग, सहायक सुरक्षा आयुक्त एस.डी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाचे प्रभारी नंदबहादुर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक मयंक मिश्रा, आरक्षक नासिर खान, आरक्षक बी कोरचाम, आरक्षक एल.एस. बघेल, आरक्षक आर.जी. बंधाटे यांनी सालेकसा येथे बाजार चौकातील अवैधरित्या रेल्वेची ई-तिकीट बनविणार्या ग्लोब कम्प्युटर ई-सेवा केंद्रावर गेले. दरम्यान दुकान संचालक मधुकर मोहनलाल हरिणखेडे (वय 41) रा. भडीपार याला रेल्वेच्या ई-तिकीट व्यापारबाबत विचारण्यात आले. चौकशीत त्याने सांगितले की, तो आयआरसीटीचा अधिकृत एजेंट नाही. पण अधिक लाभ मिळविण्यासाठी दुकानात काम करीत असलेल्या राजेश पांडुरंग बागडे (वय 32) रा. इसणाटोला याच्यासह पर्सनल आयडीने रेल्वेची ई-तिकीट बनवितो. त्यानंतर त्याच्याच परवानगिने त्याच्या दुकानात ठेवलेले कम्प्युटर तपासण्यात आले. त्यात एस 2 एलएम 123 च्या नावे बनवटी पर्सनल आयडीने 1 नग लाईव व 7 नग जुने रेल्वे ई-तिकीट असे एकूण 8 नाग आणि ग्लोबमधु या नावे बनावटी पर्सनल आयडीने एकूण 4 नग रेल्वेच्या जुन्या ई-तिकीट आढळल्या.
या प्रकारामुळे रेल्वे अधिनियमाच्या कलाम 143 चे उल्लंघन झाले आहे. त्या दोन्ही आरोपींकडून एकूण 65 हजार 086 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली आहे.




