36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home मराठवाडा/खान्देश शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे- रघुनाथदादा पाटील

शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे- रघुनाथदादा पाटील

0
44

blank

औरंंगाबाद, दि. 26-) केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने कोरोना महामारीच्या आड पारित केलेले 3 कृषी कायदे रद्दच झालेच पाहीजे असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मांडले. शेतकरी संघटनेच्या कार्यकारीणी सदस्यांची बैठक सोमवारी सावरकर चौकातील गांधी भवन येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते राज्याच्या काना-कोप-यातून आले होते. शेतकरी संघटनेच्या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्यासह संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, शेतकरी युवा आघाडीचे अ‍ॅड.अजित काळे, महिला आघाडी प्रमुख विमल आकनगिरे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, मराठी कवी लेखक संघटनेचे दिनकर दाभाडे यांच्यासह मराठवाडा प्रमुख बंडू सोळंके, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पटारे, विदर्भ प्रमुख धनंजय काकडे पाटील, मुंबई विभाग प्रमुख गणेश घुगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशवराव पाटील, औरंगाबादचे जिल्हाप्रमुख निलेश बारगळ आदींची यावेळी उपस्थिती होती. त्यांनी पुढे सांगितले केंद्रातील सरकारने कोरोना महामारीच्या काळात 28 सप्टेंबर 2020 रोजी पारित केलेल्या तथाकथित 3 कृषी सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने शेतीमालाच्या खरेदी विक्रीत देशभरात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी विरोधी आणि कृषीच्या विरोधात असलेले रद्द करण्याची मागणी बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वच सदस्यांनी केली. तर कोरोना काळातील विजबिल थकल्यामुळे शेतक-यांचे विज कनेक्शन खंडीत करण्यात येत असल्याच्या प्रश्नांकडे देखील यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी लक्ष वेधले.

blank