41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News विश्वजित कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटिस

विश्वजित कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटिस

0
54

blank

मुंबई, –राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची पत्नी स्वप्नाली भोसले यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने नोटिसबजावली आहे.२७ नोव्हेंबर २०२० रोजी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती. स्वप्नाली या अविनाश भोसले यांची कन्या असून, विश्वजित यांची पत्नी आहे.२०१९ मध्ये आयकर विभागाने अविनाश भोसले यांच्या पुणे व मुंबईतील ठिकाणांवर छापेमारी केली होती.

त्यानंतर आता स्वप्नाली भोसले यांच्या चौकशीसाठी ईडीने त्यांना नोटिस बजावली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.याआधी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबीयांना ईडीने नोटिस बजावली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर यस बँक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने नोटिस बजावली होती. वर्षा राऊत यांनी ईडीच्या चौकशीला विरोध केला होता. त्यानंतर वर्षा राऊत यांनी चौकशीला हजर राहून सहकार्य केले होते. त्यानंतर आता विश्वजित कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजावल्याचे समोर आले आहे.

blank