33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या-गोरक्ष खरड

आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या-गोरक्ष खरड

0
63

blank

पैठण,दि.01ः  विहामांडवा येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला.विहामांडवा,कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात.कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत . कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा असे आवाहन विहामांडवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड यांनी विहामांडवा येथे केले.

खरड पैठण तालुक्यातील विहामांडवा गावातील सरस्वती क्लासेस येथे एमबीबीएस पात्र ठरलेली गीता गाभूड व प्रज्ञाशोध परीक्षा मधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या तनुजा डुकरे, रुपाली बुरुंगळे, प्रतीक्षा हाकम, तेजस ताडे आदि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पोलीस चौकी विहामांडवा व पत्रकार संघटना यांनी केले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड यांच्या हस्ते करण्यात आला.  सोहळ्यास पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विक्रम थोटे,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर.ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य अफसर भाई शेख,युनूस पठाण,महेंद्रकुमार सकेलचा,अरेफ शेख,नितीन ब्रह्मराक्षस,ताराचंद नवपुते, नारायण गाभुड,अनिल गाभुड, कयूम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गोरख खरड यांनी दहावी व बारावी नंतर काय या बाबत उपस्थित विद्यार्थी , पालक ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरवण्याची जबाबदारी संस्था , विद्यार्थी.पालक या तिघांचीही आहे.शैक्षणिक क्षेत्रात पुढील प्रवेशाची प्रक्रिया समजून घ्या . प्रत्येक क्षेत्रात संधी आहे ती शोधात आली पाहिजे.त्यातून योग्य ते क्षेत्र निवडलं पाहिजे . वडिलांचे स्वप्न व तुमची महत्वकांक्षा यांची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे.मोबाईल मधील इंटरनेटचा वापर शैक्षणिक प्रगती साठी कराआपल्यातील आत्मविश्वास जागृत करून कष्ट करा.योग्य ती संधी आपल्या पुढ्यात चालत येईल.असे प्रतिपादन गोरक्ष खरड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कयूम शेख तर आभार अनिल गाभुड यांनी मानले.

blank