
औरंगाबाद, दि.01ः- जमाते इस्लामी हिंदच्या वतीने अंधारातून प्रकाशाकडे मोहिम सुरू आहे. त्यानिमित्त शनिवारी हॉटेल अलंकार येथे शहरातील विविध पदांवर कार्यरत महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी पदाधिकारी महिलांनी अनेक अंधारातून प्रकाशकडे जाण्याचे अनेक मार्ग सूचविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिनाक्षी भट्टाचार्या, जि.प. अध्यक्षा मिना शेळके, डॉ. सबा परवीन, डॉ. आएशा हाशमी, डॉ. वर्षा देशमुख, वैशाली कडू, प्रा. भिक्खूनी धम्मदर्शना महाथेरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यासह शहरातील मान्यवर डॉक्टर, इंजिनियअर, पत्रकार, शिक्षिका, प्राध्यापिका अशा पन्नासच्या जवळपास महिलांची उपस्थिती होती.
डॉ. भट्टाचार्य म्हणाल्या की, महिलांना स्वत:च्या आरोग्याची काळजी नसल्यानेच अँनिमिया सारखे आजारग्रस्त महिलांचे प्रमाण जास्त पहावयास मिळत आहे. अशावेळी वर्षातून एकदा तरी स्वत:च्या वाढदिवशी वेळ काढून स्वत:ची संपूर्ण तपासणी महिलांनी करुन घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. तर डॉ. देशमुख यांनी महिलांना स्वत:चे रक्षणासाठी काळजी घेतली पाहिजे. तसेच हिंसा घडत असताना शेजाऱ्यांनीही मदत करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. बऱ्याच तक्रार केवळ ऐकून घेतल्याने कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सबा परवीन यांनी प्रत्येकांनी प्रेमाने राहावे, असा संदेश दिला. यावेळी अँसिड हल्ला झालेली पिडीता बबीता पाटणी यांनी सांगितले की, जेव्हा माझ्यावर हल्ला झाला होता. तेव्हा मी पूर्णपणे अंधारात गेले होते, मात्र मला मिळालेल्या आई-वडीलांच्या सहकार्याने मी पुन्हा उजेडात आले. त्यामुळे सर्वांनी एकमेकांचा साथ दिल्यावर नक्कीच आपण एकदिवस कुठल्याही अंधारावार मात करुन उजेड प्रस्थपित करु शकतो. असे सांगितले. शाईस्ता कादरी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. फहीमुन्नीसा बाजी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमाते इस्लामी हिंदच्या महीला विंगच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी कोविड योद्धांचा सत्कार यावेळी कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉ. भट्टाचार्य, डॉ. देशमुख, डॉ. हर्षदा शेलार, आरती तिवारी, छाया थाेरात आदींना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.





