
नांदेड- येथील जेष्ठ पत्रकार तथा घुमान चळवळीचे मुख्य प्रवर्तक पंढरीनाथ बोकारे यांना कंधारच्या दुर्गादास सराफ प्रतिष्ठानचा डॉ बाबासाहेब आंबेडकर शोध पत्रकारिता पुरस्कार माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे संत नामदेव महाराज सभागृहात हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापनदिनानिमित्त स्व. दुर्गादास सराफ प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यास संत नामदेव महाराज संस्थान उमरजचे मठाधिपती गुरुवर्य संत एकनाथ नामदेव महाराज,माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे व रामराव पवार,माजी सनदी अधिकारी एकनाथ (अनिल) मोरे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बालाजीराव पाडांगळे,नायब तहसीलदार विजय चव्हाण, श्याम पाटील तेलंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे,देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख अनिल कसबे, देशोन्नतीचे कंधार तालुका प्रतिनिधी ऍड दिगंबरराव गायकवाड, सकाळचे लोहा बातमीदार बा. पु. गायखर, मुखेड तरुण भारतचे प्रतिनिधी चंद्रशेखर पाटील यांना हा प्रर्तिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्व. दुर्गादास सराफ प्रतिष्ठान चे प्रमुख माधवराव भालेराव, दिगंबर वाघमारे,वैजनाथ पांचाळ, गणेश कुंटेवार,मिर्झा जमीर बेग, प्रा. भागवत गोरे, प्रा. सुभाष वाघमारे,महोमद सिकंदर, एस.पी. केंद्रे, प्रा. जमील बेग, पंढरीनाथ केंद्रे, हणमंत मुसळे,सौ.अर्चना भालेराव आदींनी सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.





