41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता olx साईट वरून ऑनलाईन फसवणूकिचा गुन्हा उघडकीस;राजस्थान येथून आरोपींना अटक

olx साईट वरून ऑनलाईन फसवणूकिचा गुन्हा उघडकीस;राजस्थान येथून आरोपींना अटक

0
67

blank

वर्धा,दि.04ः- येथील लक्ष्मीनगर मधील कपील कावरा यांनी ऑनलाईन खरेदी विक्री साईट वर मारुती स्विफ्ट कार 1,,50,000/- रु बुक केली.त्यासाठी आरोपीनी फिर्यादीला वेगवेगळ्या टॅक्सच्या नावाने paytm च्या माध्यमातून ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त रक्कम 2,51,730/- रु भरायला लावले व कार देण्याकरिता आणखी रक्कम मागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने नोंदवलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना राजस्थानातून ताब्यात घेतले आहे. वर्धा शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेमार्फेत करण्यात आला. तपासामध्ये आरोपितांचे लोकेशन जिल्हा भरतपूर, राजस्थानमध्ये येत असल्याने तसेच paytm द्वारे प्राप्त माहितीवरून आरोपितांनी सदरची रक्कम ट्रान्सफर करण्याकरिता कॅनरा बँक, इक्विट्स बँक व icici बँक खात्याचा उपयोग केल्याचे निष्पन्न झाले.पुढील तपासात सदरचे बँक अकाउंट हे सुशील फौजदार,रा थुन, भरतपूर येथील व्यक्तीचे असल्याने व त्याचे Atm सद्दाम हुसेन, रा थुन जिल्हा भरतपूर हा वापरत असल्याचे आढळून आल्याने आरोपी सद्दाम हुसेन याच्या राहते घरी धाड घालून त्याला ताब्यात घेऊन आरोपी क्र. 1 व 2 यांनी फसवणूक करीता वापरण्यात आलेले बँक अकाउंटचे एटीएम कार्ड, पासबुक व 3 मोबाईल आरोपीतांकडून जप्त करण्यात आले. आरोपी सद्दाम हुसेन याला अटक करून व न्यायदंडाधिकारी, नगर न्यायालय, राजस्थान येथून त्याचे ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करून त्याला वर्धा येथे आणून पुढील पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे पुढील तपास कामी हस्तांतरित करण्यात आले आहे. तसेच आरोपी सुशील फौजदार यास प्रोडकशन वॉरंट वर वर्धा येथे जाण्याकरीता पोलीस पथक राजस्थान येथे पाठविण्यात आले आहे. अशा प्रकारे तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.तरी सदरची बातमी प्रसारित होणेस विनंती आहे. सदरची कामगिरी मा. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा, पो. नि.  निलेश ब्राम्हणे, सायबर सेल चे सपोनि रवी राठोड, पो उप नि गोपाल ढोले, HC निरंजन वरभे, HC हमीद शेख, HC रंजित काकडे, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा आणि सायबर सेल चे दिनेश बोथकर व अनुप कावळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

blank