42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home रोजगार/व्यापार नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांकरीता ऑनलाईन रोजगार मेळावा

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांकरीता ऑनलाईन रोजगार मेळावा

0
100

भंडारा दि.4:- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने टाळेबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापना, व्यवसाय आणि उद्योग पुरेशा प्रमाणात सुरू झालेले नाहीत. बरेचसे परप्रांतीय कामगार, मजूर हे त्यांच्या गावी निघून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आस्थापनांना मनुष्यबळाची भासणारी कमतरता पाहता स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या मार्फत ऑनलाईन पध्दतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 10 ते 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत करण्यात आलेले आहे.

नामांकित कंपन्या आणि नियोक्त्यांनी रिक्त पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे www.mahaswayam.gov.in या वेबपार्टलवर online job fair bhandara-5 येथे घेवून आपल्या आवश्यकतेनुसार बेरोजगार उमेदवारांची उपलब्ध असलेली यादी ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करावी. नोकरी इच्छूक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in  या वेबपार्टलवर online job fair bhandara-5 येथे ऑनलाईन अप्लाय करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांचेशी 07184-252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

blank