
औरंगाबाद, दि.10- जिजाऊ बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२१ पुरस्कार देण्यात येत आहे. हा पुरस्कार सोहळा १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पावन पर्वावर वैजापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
कलियुगात अवतरली पुन्हा पतीराजांना साथ देणारी समाजसेविका सौ.पुजा पंडीत पती समाजसेवक सुमित भाऊ पंडित यांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेचे व्रत पूर्ण करण्यात मदत करते. बेवारस मनोरुग्ण (महिलांना) अनेक आजारांच्या वा रोगांच्या व्याधीने ग्रस्त असणाऱ्या उपेक्षितांना माणूस म्हणून जीवनात आधार देणाऱ्या पतिराजांना पूर्ण मराठवाड्यात असलेल्या रुग्णालयात साथ दिली व कितीतरी मनोरुग्ण महिलांना येरवडा मेंटल रुग्णालयात कोर्टाचे आदेश घेवुन उपचारासाठी दाखल केले आहे. वेळेवर कितीही गर्भश्रीमंत असला तरी त्याला दोन वेळचे जेवण मिळवणे कसरत असते पण आपल्या कार्यक्षेत्रात बेटी बचाओ बेटी पढाओ, नारदिय किर्तनाच्या माध्यमातून गाव खेड्यात जाऊन लोकांच्या मानसिकता बदलाविनारा हा अवलिया. रक्तदान शिबीर,
रुग्णालयात रुग्णाची सेवा बेवारस नीराधारांच्या हाकेला धावनारे ज्यांना जेवन नाही त्याची भुक भागवनारे सुमित भाऊ पंडित यांना विषेश म्हणजे पत्नी सौ. पुजा दररोज गोरगरीब रुग्णांना १५ ते २० जेवनाचे डबे पुरवते. लाँकडाउनच्या काळामध्ये पुजा ने स्वतः १० कुंटल अन्य शीजवुन पायी जाणाऱ्या मजुरांना व ज्याचे घरी चुल पेटत नव्हती त्याच्या घरी पतीराजाच्या मदतीने त्याना वेळेवर अन्नदान केले होते. खंबीरपणे साथ काळीकुट्ट रात्र या पती राजाबरोबर समाजसेवेचे कार्य करणाऱ्या या समाजसेवी लढवय्या पुजा ला आतापर्यंत महाराष्ट्र विविध १६ पुरस्काराने सन्मानित करन्यात आले आहे. संस्थापक अध्यक्ष अँड धनराज अंभोरे, सचिव संतोष दोडे, कार्यक्रमाचे आयोजक
सुर्यकांत मोटे यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. समाजसेविका सौ. पुजा पंडित यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





