36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home महाराष्ट्र मंत्रालयात मोबाईल यूव्ही ऑटोमॅटिक मशीनचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते...

मंत्रालयात मोबाईल यूव्ही ऑटोमॅटिक मशीनचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन

0
29

मुंबई, दि. 11 : कोरोना विषाणूसह अन्य किटाणूंवर प्रभावी ठरणाऱ्या मोबाईल यूव्ही स्वयंचलीत मशीनचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते मंत्रालय येथे झाले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह एसबीआय फाउंडेशनचे मुख्य वित्तीय अधिकारी परमेश्वर राम, प्रकल्प प्रबंधक धवन नागर आदी मान्यवर उपस्थित होते.

blank

या मोबाईल यूव्ही विविध उपयोगी स्वयंचलीत किऑक्स मशीनच्या माध्यमातून शरीराचे तापमान मापन, शरीरातील (ऑक्सिजन) प्राणवायूची पातळी, मोबाईल निर्जंतुकीकरण, अतिनील (अल्ट्रा व्हायलेट) किरणांच्याद्वारे वस्तू, कागदपत्रांचे निर्जंतुकीकरण आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मशीन एसबीआय फाउंडेशन यांच्या सौजन्याने सी.एस.आर. निधीमधून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर युनिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुज्जम्मील शेख व पुण्यातील ईनामदार ग्रुपचे जावेद ईनामदार यांचे सहकार्य लाभले. यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी याबाबत सहकार्य करणाऱ्या एसबीआय फाउंडेशन, युनिक फाउंडेशन आणि ईनामदार ग्रुपच्या सहकार्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

blank