29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठातील डीएमएलटी आरोग्य विषयक अभ्यासक्रमाला बंदी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठातील डीएमएलटी आरोग्य विषयक अभ्यासक्रमाला बंदी

0
393

blank

मुंबई दि ११ महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकिय शिक्षण व द्रव्य विभागाने ३ फेब्रुवारी २०२१ ला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा संचालित डीएमएलटी अभ्यासक्रम हे आरोग्य विषयक असल्याने हे अभ्यासक्रम पुर्णत: आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित असने अपेक्षित आहे. त्यानुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मार्फत राबविण्यात येणारे आरोग्य विषयक अभ्यासक्रम बंद करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश पारित केले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ची डीएमएलटी या अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचे जावक क्रमांक आरटीआय/१०५/२०१९ अंतर्गत दि २३/११/२०१९ ला उप कुलसचिव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांनी कबुल केले आहे.
दरम्यान, वैद्यकिय शिक्षण व द्रव्य विभाग नविन मंत्रालय मुंबई यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मार्फत डीएमएलटी आरोग्य विषयक अभ्यासक्रम राबविण्यात येतो किंवा कसे याबाबत शासन पत्र दि १५ जानेवारी २०२१ ला माहिती मागविण्यात आली होती. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या खुद्द वैद्यकिय शिक्षण व द्रव्य विभागाकडेच उपलब्ध नाही.
त्यामुळे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संचालित डीएमएलटी अभ्यासक्रमाला महाराष्ट्र शासनाची देखिल मान्यता नव्हतीच, हे यावरुन पुन्हा स्पष्ट झाले, हे विशेष. दरम्यान महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद मुंबई यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

blank