34.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ “शोध..लोककला, गायन, नृत्य, नाट्य,सीक्रेट सुपरस्टार्स यांचा” कार्यक्रम

“शोध..लोककला, गायन, नृत्य, नाट्य,सीक्रेट सुपरस्टार्स यांचा” कार्यक्रम

0
38

blank

गोंदिया: – “बेटी बेटी बचाओ अभियान” अंतर्गत, कलेशी संबंधित कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सर्व भावी पिढ्यांच्या भावी विकासासाठी आणि सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच त्यांना उत्कृष्ट संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देश्याने रविवार 14 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2:30 वाजता संविधान मैत्री संघ, नुपूर डान्स अकॅडमी आणि गोंदिया जिल्हा म्युझिकल ग्रुप तर्फे जिल्हास्तरीय “शोध.. सीक्रेट सुपरस्टार्स यांचा कार्यक्रम स्थानिक आम आदमी रैन बसेरा शिव मंदिर, सिंडिकेट बँकेसमोर दुर्गा चौक रेल्वे स्टेशन रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय भावनेने प्रेरित क्लासिकल वर आधारित नृत्य, गायन, नाट्य, काव्य प्रस्तुती, लोककला अशा विविध कला क्षेत्रातील कलावंतांना खुल्या व्यासपीठाखाली विनामूल्य आमंत्रित केले गेले आहे. नोंदणी, कार्यक्रम प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. कार्यक्रमविषयी अधिक माहिती, प्रवेश व रजिस्ट्रेशन करिता एसएमएस ग्रुपचे अतुल सातदेवे 9370415505, नुपूर डान्स अकॅडमी संचालीका चित्रा पाटील 8830087814, शिव नागपुरे 7972797419 यांच्याशी 14 फेब्रुवारी सकाळी 11 वाजे पर्यंत निशुल्क संपर्क साधू शकतात.