अर्जुनी-मोर -तालुक्यातील ईसापूर ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकविला आहे. सरपंच पदावर सौ कल्पना शिवकुमार करंबे तर उपसरपंच पदावर दिलीप नामदेव सोनवणे विराजमान झाले.सरपंच उपसरपंच निवडीत इसापूर गावात काही वेळ तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.भाजपा समर्थित तीन तर गाव विकास पॅनल समर्थीत तीन उमेदवार निवडून आले होते.गजानन चांदेवार यांच्या गटाची एक महिला उमेदवार निवडून आली होती.त्यामुळे एकमेव निवडून आलेल्या कल्पना करंबे ह्या कोणत्या गटाला जाऊन मिळतात याकडे लक्ष लागले होते.गजानन चांदेवार हे भाजपा समर्थक असल्याने सौ करंबे यांना सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून सरपंचपदी आरूढ करण्यासाठी भाजपाच्या तीन उमेदवारांनी मतदान केल्याने कल्पना करंबे यांना चार मते मिळाली तर गाव विकास पॅनलच्या दीक्षा लांजेवार यांना तीन मते मिळाली तसेच उपसरपंच पदासाठी गाव विकास पॅनल ने दिलीप सोनवणे यांचे नामनिर्देशन पत्र उपसरपंच पदासाठी दाखल केले होते तसेच भाजपा समर्थित दिलीप सोनवणे यांना आपल्या गटात आणण्यासाठी विकास पॅनलने आटोकाट प्रयत्न करूनही दिलीप सोनवणे यांनी भाजपा समर्थित उमेदवार सौ कल्पना करंबे यांना मतदान केले तर उपसरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन असलेले दिलीप सोनवणे यांना अविरोध उपसरपंच पदावर विजयी घोषित करण्यात आले. अध्यासी अधिकारी म्हणून तलाठी एम.एच.टेंभरे यांनी काम पाहिले. तलाठी निमकर, ग्रामसेवक विनोद एस श्रीवास्तव उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक विनोद श्रीवास्तव यांनी विजयी सरपंच सौ कल्पना करंबे व उपसरपंच दिलीप सोनवणे व इतर ग्रामपंचायत सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
पवनी/धाबेच्या सरपंचपदी पपीता नंदेश्वर
अर्जुनी /मोर :-तालुक्यातील पवनी/धाबे ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी श्रीमती पपीता नंदेश्वर यांची तर उपसरपंच पदी पराग कापगते यांची निवड झाली आहे.आपसातील मतभेद विसरून ग्रामविकासाच्या कामाला लागूया असे आवाहन नवयुक्त सरपंच आणि उपसरपंच यांनी याप्रसंगी केले आहे.
ग्रामपंचायत पवनी/धाबे च्या सरपंच आणि उपसरपंच पदासाठी आज (ता. 12) निवडणूक घेण्यात आली. यामध्ये श्रीमती नंदेश्वर ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर उपसरपंच पदाची निवडणूक चुरशीची झाली आहे. श्री कापगते यांनी 5 मते मिळवून त्यांचे निकटतम प्रतिद्वंद्वी श्रीमती दीपिका चुटे यांचा 1 मताने पराभव केला.
निवडणूक सभेच्या सुरुवातीपासूनच सदस्य आणि गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. दरम्यान गावकर्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. फटाक्याच्या लड्या फोडून गावात आनंद व्यक्त करण्यात आला.
अध्यासी अधिकारी म्हणून तलाठी सुरेश हरिणखेडे यांनी काम पहिले. यावेळी तलाठी श्रीमती ए. बी. बिसेन आणि ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी सहकार्य केले.
नरेश आदमने, डॉ. शैलेंद्र भांडारकर, कलीराम काटेंगे, आनंदराव डोंगरवार, विलास राऊत, शिवाजी कमरो, मिताराम दररो, नारायण उरकुडे, हिवराज शहारे, हरिदास टेम्भूरणे, राजेंद्र टेम्भूरणे, श्यामराव नंदेश्वर, कुशन इसकापे, रमेश राऊत, कैलास नंदेश्वर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
रावणवाडी सरपंचपदी शिला वासनिक व उपसरपंचपदी पन्नालाल हरिणखेडे
गोंदिया तालुक्यातील रावणवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर माजी आमदार गोपालदास अग्रवाल समर्थित पॅनलच्या शिला वासनिक व उपसरपंच पदावर पन्नालाल हरिणखेडे यांची निवड करण्यात आली.तर गात्रा येथे चाबी संघटनेचे कुलदीप पटले सरपंच पदी तर आशिष मिश्रा उपसरपंच पदावर निवडून आले.सावरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या माधुरी पटले तर उपसरपंचपदी टेकचंद दमाहे यांची निवड करण्यात आली.




