
गडचांदूर – गडचांदूर शहरातील नव्याने विकास कामाचे अवाढव्य किंमत दाखवून अंदाजपत्रक तयार करून नगर परिषदच्या फंडाची उधळपट्टी होत असल्याचे विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी नगर परिषद प्रशासनाच्या लक्ष्यात आणून दिले व ते प्रशासनाने मान्य करून त्यांचे आभार सुद्धा मानले.व त्या अंदाजपत्रकाची दुरुस्ती करण्याची कार्यवाई चालू केली.
परन्तु डोहे यांचे आणखी असे लक्ष्यात आले की ग्रीन जिम च्या अंदाजपत्रकात अवाढव्य किंमत दाखवून संगनमताने तांत्रिक मंजुरी करवून घेतली अणि त्याची प्रशासकीय मंजुरी घेऊन निविदा काढण्यात आल्या.तेव्हा त्यांनी नगराधक्ष्य तथा मुख्याधिकारी यांना दि 27/10/2021 पत्र दिले की सदरच्या निविदा रद्द करून फेर अंदाजपत्रक तयार करून काम करण्यात यावे परन्तु त्यांच्या पत्रावर दुर्लक्ष करून सदरच्या निविदा उघडल्या तेव्हा यांच्या हितचिंतकाच्या व्यतिरिक्त इतर एक जास्तीची निविदा आली तेव्हा सदरचे काम हे आपल्याच हितचिंतकास मिळण्या करिता वेगवेगळ्या जाचक अटी शर्ती घालण्यात आल्या होत्या तेव्हा यांच्या हितचिंतकाच्या निविदा व्यतिरिक्त कृष्णमूर्ती चिंतावार यांची निविदा होती व त्यांची फार कमी दराची असल्याचे कळते व त्यांनी अटी शर्ती तील सम्पूर्ण कागदपत्र जोडले असताना सुद्धा त्यांच्या निविदा निविदा समितीने जाणीव पूर्वक अपात्र ठरविले व यांच्या हितचिंतकाच्या बाकी तिन्ही ही निविदा धारकाचे अट क्र 7 व 15 ची पूर्णता न करता त्यांच्या निविदा पात्र ठरविल्या तेव्हा विरोधी नगरसेवक श्री डोहे यांनी मा नगराधक्ष्य यांना दि 10/2/2021 ला पत्र देऊन निविदा समितीचा भोंगळ कारभार पत्राद्वारे लक्षयात आणून दिला तरी आपण सदरच्या निविदेचा दर निश्चित न करता रद्द करावा व नव्याने योग्य दराचे अंदाजपत्रक तयार करून फेर निविदा काढाव्या अन्यथा निविदा समिती सोबत आपले हितगुज असल्याचे समजून न्यायालयात जावे लागतील अशा आशयाचे निवेदन दिले असून यावर नगराधक्ष्य काय निर्णय घेतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.




