32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ कोचिंग क्लास, दुकान व गोदामाला केले सील

कोचिंग क्लास, दुकान व गोदामाला केले सील

0
120

गोंदिया : नगर परिषदेने कर वसूली अभियानांतर्गत कोचिंग क्लास, दुकान व गोदाम सील केले आहे. ही कारवाई 15 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

नगर परिषदेच्या कर वसूली अभियानाने पन्नालाल दुबे वॉर्डातील सविता प्रमोद जैन यांच्या इमारतीला सील केले. त्या इमारतीत भाड्याने चालणार्‍या इक्वेशन कोचिंग क्लास व एका कार्यालयाला सील करण्यात आले. या इमारतीचे सन 2016-17 पासून 1 लाख 15 हजार 409 रुपयांचे कर बाकी होते. दुसरी कारवाईत पन्नालाल दुबे वॉर्डातील रतनलाल रिखिलाल जैन यांच्या गोदाम व इमारतीला सील करण्यात आले. त्यांच्यावर सन 2015-16 पासून 1 लाख 23 हजार 118 रुपयांचे कर बाकी होते.

तसेच इतर कारवाईमध्ये बी.एम. पटेल वॉर्डातील हेमराज पन्नालाल बोपचे यांच्या दुकानाचे शटर बंद करण्यात आले. मनोहरभाई वॉर्डातील कुरेशा बेगम इस्माइल कुरेशी यांच्यावर अधिपत्र कारवाई करून एका दिवसाचा जप्ती वारंट देण्यात आला. त्यांच्यावर सन 2003-04 पासून 72 हजार 729 रुपयांचे कर थकीत होते.सदर कारवाई मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य अधिकारी तथा कर निरीक्षक विशाल बनकर व कर विभागाच्या कर्मचार्‍यांनी केली.